...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!
`अब की बार... तीनसौ पार...` ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.
लखनऊ : 'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.
उत्तरप्रदेशात 'केसरिया होळी'
300 हून अधिक जागा जिंकून भाजपनं दोन तृतियांश बहुमत काबीज केलंय. त्यामुळं 2002 नंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'केसरिया होळी' खेळली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांचं संघटन कौशल्य यांच्या जोरावर भाजपनं ही विजयश्री खेचून आणली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा भगवा रंग अजूनही उत्तर प्रदेशात कायम असल्याचं या निकालानं स्पष्ट केलंय.
सपाची सायकल 'पंक्चर'
तर गेल्या वेळी 224 जागा मिळवणाऱ्या समाजवादी पार्टीची यावेळी अक्षरशः धूळधाण झाली. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी अखिलेश यादव यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याशी हातमिळवणी केली. काँग्रेसचं जहाज तर बुडालंच, पण सपाची सायकलही पंक्चर झाली. बसपाच्या मायावतींचा हत्ती तर साफ आडवा झाला.
यानंतर चर्चा सुरू झालीय ती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार याची...
1. केशव प्रसाद मौर्य
बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते... संघ परिवाराच्या जवळचे... केशव मौर्य हे मौर्य समाजाचे आहेत. यादव नसलेला ओबीसी चेहरा म्हणून मौर्य यांच्याकडे पहिले जातंय. ते सध्या फूलपूर मतदारसंघातून खासदार आहेत.
2. दिनेश शर्मा
सध्या लखनऊ महापौर आहेत. लखनऊ विद्यापीठातील प्राध्यापक... पन्नाशीच्या आतील ब्राम्हण चेहरा... सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष... भाजपने १० कोटी सदस्य केले त्या मोहीमेचे प्रमुख...
3. महेश शर्मा
सध्या सांस्कृतिक मंत्री असलेले महेश शर्मा सुप्रसिद्ध सर्जन आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे.
4. मनोज सिन्हा
मनोज सिन्हा मूळचे पूर्वांचल गाजीपूरचे... त्यांनी बीएचयूमधून आयआयटी मध्ये शिक्षण घेतलंय. सध्या त्यांच्याकडे टेलिकॉम मंत्रालय आहे. मोदींच्या जवळचे आहेत. ते भूमिहार जातीचे आहेत.
5. स्मृती इराणी
स्मृती इराणी यांनी यापूर्वी यूपीतून निवडणूक लढविली आहे. महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे येऊ शकते... स्मृती इराणी वादग्रस्त असल्यामुळे त्यांच्या नावासंदर्भात शक्यता कमी आहे. तरीही मुख्यमंत्री पदाच्या रेसमधील नाव आहे.