मुंबई : गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशी दिली जाते. ही फाशी सूर्योदयाआधी द्यायचा नियम आहे. सूर्योदयाआधी दोषीला फाशी का देण्यात येते यामागे काही कारणं आहेत. 


नैतिक कारणं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याला फाशी होणार आहे त्याला दिवसभर फाशीसाठी थांबवणं नैतिकतेला धरून नाही. दोषीला फाशीसाठी दिवसभर थांबवलं तर त्याच्या मनावर विपरित परिणाम होऊ शकतो. पहाटेच्या वेळी दोषी व्यक्ती मानसिकदृष्टा तणावमुक्त असतो.  या कारणामुळे दोषीला पहाटे उठवलं जातं, यानंतर त्याचे नित्यकर्म झाल्यावर त्याला फासावर चढवलं जातं.


प्रशासनिक कारणं


फाशी दिल्यावर पार्थिवाबाबतच्या कागदोपत्री अनेक प्रक्रिया जेल प्रशासनाला पूर्ण कराव्या लागतात. फाशी दिल्यानंतर डॉक्टर पार्थिवाची मेडिकल टेस्ट घेतात. यानंतर जेल प्रशासनाच्या रजिस्टरमध्ये एन्ट्री करावी लागते, तसंच अन्य कागदपत्रांचीही पूर्तता करावी लागते. या सगळ्यामध्ये बराच वेळ लागतो आणि पार्थिव दोषीच्या नातेवाईकांना द्यायलाही उशीर होतो. हे ही पहाटे फाशी देण्याचं एक कारण असल्याचं बोललं जातं.