पॉर्न फिल्मसारखे करायला नकार दिल्याने महिलेला पतीची मारहाण
अजमेर : राजस्थानातील अजमेर येथे पत्नीच्या छळाची एक विचित्र घटना समोर आली आहे.
अजमेर : राजस्थानातील अजमेर येथे पत्नीच्या छळाची एक विचित्र घटना समोर आली आहे. पॉर्न फिल्म्स पाहून आपल्या पत्नीला त्याची नक्कल करायला सांगितल्यावर पत्नीने त्यास नकार दिल्याने तिला जबर मारहाण केल्याची ही घटना आहे.
रविवारी या महिलेला झालेल्या मारहाणीनंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या पतीचा प्रिटींगचा व्यवसाय आहे. त्याने गेल्या वर्षभरापूर्वी एक स्मार्टफोन विकत घेतला. यामुळे या महिलेचे जगणे म्हणजे नरकासमान झाले.
एक फोन ठरला वादाचे कारण
तिचा पती नेहमी त्याच्या मोबाईलवर वेगवेगळ्या पॉर्न फिल्म डाऊनलोड करू लागला आणि त्यातील कलाकारांप्रमाणे तिला वागण्यास भाग पाडू लागला. याचा त्रास होऊ लागल्यावर या महिलेने तसे वागण्यास नकार दिला. यामुळे तो भडकला आणि तिला वाईट पद्धतीने मारहाण करू लागला. विशेष म्हणजे हा फोन त्याच्या हातात येण्यापूर्वी त्यांच्यात कसलेही वाद नसल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
रविवारी पोलिसांनी अटक करुन कोर्टात सादर केल्यावर या व्यक्तीला जामीन मंजूर झाला आहे. पण, आपल्या पतीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी या महिलेची इच्छा आहे.