नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये यंदाच्या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. राजधानीमध्ये लोधी रोड भागात सर्वात कमी, 2.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे.


राजस्थान, हरियाणामध्येही थंडीचा जबर तडाखा बसतोय. त्यातच काही भागांत पावसाचा शिडकावा झाल्यामुळे थर्मामिटरचा पारा आणखी खाली आला आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये आणि लडाख भागात पारा शुन्याच्या आणखी खाली गेला आहे. दिवसाच्या कमाल तापमानामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.