दिल्लीत धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार
दिल्लीमध्ये धावत्या रेल्वेत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. शाहदरा आणि जुनी दिल्ली स्थानकादरम्यान ही घटना घडलीये.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये धावत्या रेल्वेत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. शाहदरा आणि जुनी दिल्ली स्थानकादरम्यान ही घटना घडलीये.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी डब्यात एकूण पाच महिला प्रवास करत होत्या. त्यातील चार महिला शाहदरा स्टेशनवर उतरल्या. त्यानंतर ट्रेनमध्ये महिलेला एकट पाहून तीन अन्यात व्यक्तींनी रेल्वेमध्ये शिरकाव केला. त्यातील दोघे जण महिलेकडील बॅग घेऊन पसार झाले आणि तिसऱ्या व्यक्तीने पीडित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला ही एका कौटुंबिक समारंभासाठी दिल्लीला जात होती.
दोन कॅान्स्टेबल रेल्वेत चढल्यानंतर घडलेला सारा प्रकार पाहिला. रेल्वे जुन्या दिल्ली स्थानकावर पोहचल्यानंतर पीडित महिलेला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकऱणातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.