नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना घडली आहे. दिल्लीतल्या बुराडी परिसरात सकाळी भर रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य मलिक या हल्लेखोरानं या मुलीवर तब्बल 22 पेक्षा जास्त वार करून तिची निर्घृण हत्या केली. आरोपी आदित्य गेल्या काही दिवसांपासून या तरुणीच्या मागे होता. यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र दोघांच्या कुटुंबांमधील चर्चेनंतर वाद मिटला होता. मात्र आज पुन्हा सकाळी हल्लेखोर आदित्यनं तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर धारदार शस्रानं हल्ला केला. 


भररस्त्यात हा थरार सुरू असताना जमलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालय़ात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारानंतर तिचा दुर्दैवी अंत झाला. 


मात्र, या निमित्ताने समाजातल्या असंवेदनशीलेचं आणखी एक उदाहरण पुढं आले आहे. नागरिकांनी थोडीशी हिंमत दाखवली असती तर कदाचित तरुणीचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रीया उमट आहे.