बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार
जैसलमेरमध्ये बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे.
जैसलमेर: जैसलमेरमध्ये बलात्कार पीडित तरुणीने बलात्काराने जन्म झालेल्या बाळाला संभाळण्यास नकार दिला आहे.
बलात्कार झाल्यानंतर गर्भवती राहिलेल्या पीडित तरुणीने एका लहान मुलीला जन्म दिला होता. आता ती मुलगी 11 वर्षाची असून, बलात्कार पीडित तरुणी त्या लहान मुलीला अनाथाश्रमात ठेवणार आहे.
आता बलात्कार पीडित तरुणीने बाडमेर जिल्हयाच्या कलेक्टरांना मुलीला अनाथाश्रमात ठेवण्यासाठी विंनती केली आहे. बाडमेर जिल्हयाच्या कलेक्टरांनी पीडित तरुणीला या घटनेसंबधी आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.
बलात्कार करणाऱ्या आरोपीने पीडित तरुणीच्या वडिलांची हत्या केली, आणि तिच्याच चुलत बहिणीवर बलात्कार करुन तिला विकले होते. बलात्कार झाला तेव्हा पीडित तरुणी नाबालिक होती, त्यामुळे या सर्व धक्कादायक प्रकारांमुळे पीडित तरुणी अस्वस्थ होती.
बलात्काराच्या घटनेनंतर ग्रामपंचायत ने आरोपीला पीडित तरुणीला संभाळण्याची शिक्षा दिली, यानंतर सुध्दा अनेक वेळा पीडित तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणी जयपूरवरून पळून परत आपल्या गावी आली.
गावच्या पोलिस स्थानकात पीडित तरुणीने आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून या धक्कादायक घटनेनंतर पीडित तरुणी मानसिकरित्या पुर्णपणे खचली आहे.