धर्मशाला : पाकिस्तानच्या विरोधात देशभरात संतापाची लाट आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु आहेत. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे एकाने यूएनच्या महासचिवांना रक्ताने पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मशालामधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश यादवने विरोध प्रदर्शन करत म्हटलं की, त्यांनी संयुक्त राष्ट्रकडे अशी मागणी केली आहे की, पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावं. यासाठी त्यांनी रक्ताने पत्र लिहिलं आहे.


यादव यांनी म्हटलं की, पाकिस्तान मागील काही वर्षांपासून दहशतवादी गटांना त्यांच्या देशात पाळत आहेत. त्यामुळे त्यांना दहशतवादी राष्ट्र घोषित करावं.


उडीमध्ये लष्करवार झालेल्या हल्ल्यावर आणि त्यानंतर PoK मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त होत आहे.