नवी दिल्ली : नोट रद्द झाल्यानंतर आणि नव्या नोटा आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नोटा व्हायरल होऊ लागल्या. 'सोनम गुप्ता बेवफा है!' ही नोट तर अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. पण कदाचित अनेकांना माहिती नसेल की नोटवर असं लिहिने अडचणीत आणू शकतं. अशा प्रकरणात तुरुंगवास देखील होऊ शकतो.


नोटवर लिहिने, फाडणे, जाळणे यासारख्या गोष्टी कायद्यानुसार अपराध आहेत. भारतीय चलन घेण्यास कोणत्या व्यक्तीने नकार दिला तरी त्याविरोधात कारवाई होऊ शकते. चलनासंदर्भात देखील वेगवेगळे कायदे भारतीय संविधानात आहेत. त्यामुळे चलनावर लिहिने किंवा त्याचा अवमान करणे हे देखील कायदेशीर गुन्हा आहे. तरतुदीनुसार शिक्षा देखील होऊ शकते.