लखनौ : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते. यावेळी केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  यावेळी सपाचे नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव हेही व्यासपीठावर दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला हजर होते., ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी, मनोज तिवारी हे देखील उपस्थित होते.


योगी आदित्यनाथ यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी म्हणून आहे. शिवाय अनेकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर टीका देखील झाली आहे.


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी केशव प्रसाद मौर्य आणि मनोज सिन्हा यांची नावं आघाडीवर होती. मात्र, अखेर योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात भाजपनं मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली.