लखनऊ : महिलांच्या सुरक्षेसाठी बनवल्या गेलेल्या अँटी रोमियो स्क्वॉड नंतर आता योगी सरकारने भू माफियांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार योगी सरकार आता लँड माफिया स्क्वॉड बनवणार आहे. योगी सरकारने अँटी लँड माफिया स्क्वॉड तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.


यामध्ये बेनामी संपत्तीवर कारवाई करण्यासाठी तरतूद करण्यात आले आहे. यूपी सरकारमधील मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'अधिकाऱ्यांना जमीन माफियाची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये काही लोकांना अटक देखील करण्यात आली आहे. भाजपच्या संकल्प पत्रानुसार भू माफियांसोबतच अवैध पद्धतीने उत्खनन करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.'