लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशच्या विधानसभेला संबोधित केलं. यावेळी योगींनी म्हटलं की, सत्ताधारी आणि विरोधक सोबत मिळून काम करावं लागेल. आपल्याला जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, निवडणुकीदरम्यान जरी एकमेकांवर प्रहार केले गेले असले तरी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये कोणताही भेदभाव नाही केला जाणार. योगींनी विरोधकांना अपील केलं आहे की, ज्या प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी हृदयनारायण दीक्षित यांचं सर्वसमत्तीने निवड झाली तसंच उत्तर प्रदेशच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे.


आदित्यनाथ यांनी म्हटलं की, लोकं निवडणुका लढून येतात. निवडणुकीत मंचावरुन आम्ही एकमेकांवर प्रहार करतो पण विधानभवन हे यापासून लांब राहून यूपीच्या २२ कोटी जनतेबद्दल विचार करतो. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून काम करु शकेल. जनतेने आपल्याला ज्यासाठी निवडून दिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी एकत्र मिळून काम करु. माझी सरकार विरोधकांसोबत कोणताही भेदभाव करणार नाही.