नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दमदार विजयानंतर रविवारी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच विवाह न झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांच्या नावाने आणखी एक नाव सामाविष्ट झालेय.


भारतातील ६ मुख्यमंत्र्यांनी विवाह केलेला नाहीये 


४४ वर्षीय आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे अविवाहित पुरुष मुख्यमंत्री आहेत.
उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचेही लग्न झालेले नाहीये.
हरियाणाचे ६२ वर्षीय मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही विवाह केलेला नाहीये.
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही लग्न केलेले नाहीये.
बीजू जनता दलाचे प्रमुख आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचाही विवाह झालेला नाहीये.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही विवाह केलेला नाहीये.
नवीन पटनायक आणि ममता बॅनर्जी वगळता इतर सर्व अविवाहित मुख्यमंत्री भाजपचे आहेत.