नवी दिल्ली : देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक आणि तीन सरकारी इंधन विक्री कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.


ज्यांना रोख रकमेची गरज आहे... त्यांनी आपलं डेबिट कार्ड पेट्रोल पंपावर स्वाईप केल्यावर पेट्रोल पंप चालक त्यांना दोन हजार रुपये देतील.


आजपासून स्टेट बँकेच्या पॉईंट ऑफ सेल स्वाईप मशीन उपलब्ध असणाऱ्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा मिळेल. पण, येत्या काही दिवसात इतर बँकाही सुविधा सुरू करतील अशी आशा पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशननं व्यक्त केलीय.