मुंबई : वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झकीर नाईकला ईडीने मोठा दणका दिलाय. झाकीर नाईकच्या इस्लामीक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या एकूण १८ कोटी ३७ लाख रूपये किंमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.


याआधी ३० डिसेंबरला झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एनआयएनं ७ मार्चला झाकीर नाईकला हजर राहण्याची नोटीस दिली होती पण तरीही झाकीर नाईक उपस्थित राहिला नाही अखेर आता ३० मार्चला झाकीरला दिल्लीतल्या एनआयए मुख्यायलयात हजर राहावं लागणार आहे.