इस्लामाबाद : भारतात मान्सूनची प्रतिक्षा असताना शेजारील पाकिस्तानात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे, पाकिस्तानातील वादळी वाऱ्याच्या पावसात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरांच्या पडझडीत दबले गेल्याने मृत्यूचा आकडा वाढला आहे. जखमींचा आकडा १४९ वर आला आहे. रावळपिंडीमध्ये 148 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. वादळी वारे आणि पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


'इस्लामाबाद, पंजाब आणि पख्तनूख्वा भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर पडली आहेत. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्लामाबादमधील १ घर पडून एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.