काबुल : गुरुवारी अफगाणिस्तानात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या नगराहार प्रांतात आजपर्यंतचा सर्वात मोठा अण्वस्र विरहीत बॉम्ब 'जीबीयू-४३'च्या सहाय्यानं हल्ला केला. दरम्यान, यावेळी या भागात भारतीयही उपस्थित असल्याचं समजतंय. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. परंतु, या वृत्ताला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.


काही दिवसांपूर्वी केरळमधून २१ तरुण गायब असल्याचं समोर आलं होतं. हे सर्व जण अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी संघटना 'इसिस'मध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात येत होतं. बेपत्ता झालेल्या अशफाक या तरुणानं हफिसुद्दीन याच्या कुटुंबियांना संदेशत पाठवून त्याच्या मृत्यूची बातमी दिली होती. 


केरळमधून बेपत्ता झालेले तरुण बॉम्बहल्ला झाला त्यावेळी नगरहार भागातच असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, त्यांच्या मृत्यूच्या बातमीला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.