वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओरलँडमध्ये एका २२ वर्षीय सिंगरची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. क्रिस्टिना ग्रिमी असं या सिंगरचे नाव आहे. कॉन्सर्टमध्ये तिच्या फॅन्सना ऑटोग्राफ देत असतांना तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावृत्ताला फ्लोरिडा पोलिसांनीही दुजोरा दिलाय.
सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी रात्री घडली. क्रिस्टिना तिच्या बँड 'बिफोर यू एक्झिट'सोबत ओरलँडोमध्ये परफॉरर्मन्स देत होती. कॉन्सर्ट संपल्यानंतर तिच्या फॅन्सनी तिला घेरले. जेव्हा ती तिच्या फॅन्सना ऑटोग्राफ देत होती, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर गोळ्या झाडल्या.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात हल्लेखोरही ठार 


जेव्हा क्रिस्टिनावर गोळ्या घातल्या तेव्हा तिचा भाऊ हल्लेखोराच्या मागे धावला. दोघांमध्ये काही वेळ झटापट झाली. त्या झटापटीत हल्लेखोराने स्वत:वरच गोळी चालवली. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.



क्रिस्टिनाच्या फॅन्सच्या प्रतिक्रिया 


जसे तिच्या फॅन्सना क्रिस्टिनाच्या मृत्यूसंबंधी कळले तशा तिच्या फॅन्सच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. क्रिस्टिनाने तिचा पहिला अल्बम २०११ मध्ये रेकॉर्ड केलेला. तिचे यू-ट्यूबवर अनेक व्हिडिओज खूप हिट झालेत.