काठमांडू : नेपाळमध्ये एक लहान प्रवासी विमानाला अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नेपाळमधील 'तारा एअरलाईन्स'च्या विमानाला हा अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोखरा विमानतळावरुन हे विमान जोमसोमच्या दिशेने जात होते. या विमानात एकूण २३ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. उड्डाणानंतर अगदी काहीच वेळात या विमानाचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला.


आता या विमानाच्या अवशेषांचा शोध सुरू आहे. यात प्रवास करत असलेल्या प्रवाशांसंदर्भात अद्यापतरी काही माहिती मिळू शकलेली नाही. पोखरा हे काठमांडूच्या पश्चिमेला २०० किलोमीटरवर असलेले प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पोखरा ते जोमसोम हे केवळ २० मिनिटांचे हवाई अंतर आहे. या विमानात दोन परदेशी नागरिकही प्रवास करत असल्याची माहिती आहे.