स्टॉकहोम : स्वीडनच्या उपसला शहरात धक्कादायक घटना समोर आलीये. येथील एका २१ वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार करुन हा व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर लाईव्ह सुरु असलेला हा व्हिडीओ सुरुवातीला लोकांना फेक वाटला. मात्र काही वेळाने हा व्हिडीओ फेक नसून खरा असल्याची माहिती मिळालीये. 


याप्रकरणी एका महिलेने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्या तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. 


पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.