नवी दिल्ली : अणूइंधन पुरवठादार गट, अर्थात NSGच्या भारताच्या सदस्यत्वाला 5 देशांनी विरोध केलाय. ब्राझिल, टर्की, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड या देशांनी आपला विरोध दर्शवलाय. 


भारत हा NPT म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी करारात सहभागी नसल्यामुळे NSG सदस्यत्व देण्यात येऊ नये, असं या देशांचं म्हणणं आहे. मॅक्सिकोनं भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा जाहीर केला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये NSGची परिषद सुरू आहे. या परिषदेत भारताच्या सदस्यत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे.