आश्चर्य! या ५ ठिकाणी सूर्य मावळत नाही
आम्ही तुम्हाला असे काही ठिकाण सांगणार आहोत जेथे सूर्य कधीच मावळत नाही. पाहा कोणते आहेत ते ५ ठिकाण.
मुंबई : आम्ही तुम्हाला असे काही ठिकाण सांगणार आहोत जेथे सूर्य कधीच मावळत नाही. पाहा कोणते आहेत ते ५ ठिकाण.
१. नॉर्वे : मे ते जून या महिन्यादरम्यान जवळपास ७६ दिवस येथे सूर्य कधीच नाही मावळत. या ठिकाणाला लँड ऑफ द मिडनाईट सन असं ही म्हणतात. तुम्ही या जागेचा आनंद घेऊ शकता.
२. स्वीडन : येथे मे पासून ऑगस्ट पर्यंत सूर्य हा अर्ध्या रात्री मावळतो आणि सकाळी ४.३० ला पुन्हा उगवतो. तुम्ही येथे अर्ध्या रात्री ही सूर्य किरणांचा आनंद घेऊ शकता.
३. आईसलँड : आईसलँड येथे १० मे ते जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. या ठिकाणी अनेक ठिकाण खूप सुंदर आहेत पण ती ठिकाणं अर्ध्या रात्री पाहण्यात आणखी आनंद आहे जेव्हा अर्ध्या रात्री ही सूर्याचा प्रकाश असतो. हा एक अविस्मरणीय क्षण असतो.
4. कॅनडा : येथे काही ठिकाणं अशी आहेत जेथे उन्हाळ्यात जवळपास ५० दिवस सूर्य हा चमकत असतो.
५. फिनलँड : येथे देखील जवळपास ७३ दिवस सूर्य हा प्रकाशित असतो. येथे हे ७३ दिवस खूपच अविस्मरणीय क्षण असतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात.