कराची : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील एक प्रसिद्ध सुफी दर्ग्यात शनिवारी एका आत्मघाती हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसहीत कमीत कमी 52 जणांना आपला प्राण गमवावे लागलेत. तर या हल्ल्यात 100 हून अधिक जण जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी संघटना 'इसिस'नं या हल्ल्याची जबाबदारी स्वाकारलीय. सुफी दर्गा शाह नुरानीमध्ये सूफी नृत्य 'धमाल' सुरू असताना हा हल्ला झाला. 


या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. 'एक्सप्रेस ट्रिब्युन'नं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचं सांगितलंय. एका 14 वर्षांच्या मुलानं हा आत्मघाती हल्ला घडवून आणला.