वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधारीत बंदी आदेश काढला आहे. सात ऐवजी आता सहा देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी असणार आहे. सुधारीत बंदी आदेशानुसार इराकला वगळण्यात आलंय.


अमेरिकेशी सहकार्य वाढवून व्हिजाबाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करेल, असं आश्वासन इराकनं दिलंय. सुदान, सिरीया, इराण, लिबीया, सोमालीया आणि येमेन या मुस्लीम देशातील नागरिकांसाठी ९० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र या आदेशावरुन मुस्लीम जगतात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. अमेरिकेतील कोर्टामध्येही आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.