फक्त ३ तासात एटीएममधून ९०० कोटींची चोरी
जपानमध्ये एका खोट्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तब्बल १३ मिलियन अमेरिकन डॉलर एटीएममधून चोरले आहेत. फक्त ३ तासात या चोराने या पैसे चोरले.
टोकियो : जपानमध्ये एका खोट्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तब्बल १३ मिलियन अमेरिकन डॉलर एटीएममधून चोरले आहेत. फक्त ३ तासात या चोराने या पैसे चोरले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएममधून एवढी मोठी रक्कम चोरी करण्याच्या घटनेमागे एका व्यक्तीचं काम असू शकत नाही. कारण १३ वेगवेगळ्या शहरातून ४०० एटीएम मशीनमधून हे पैसे काढण्यात आले होते. साउथ अफ्रिकेच्या एका बँकेचा यामध्ये हात असल्याचं मिळालेल्या माहितीवरुन समोर आलं आहे. एटीएम डेटामधून माहिती समोर आली आहे की, यासाठी जवळपास १६०० खोचे क्रेडिट कार्ड वापरले गेले आहेत.