जगाच्या पाठीवर आणखी एक खंड
न्यूझीलंड हा देश एक मोठं क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागरातील एक बेट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस 1500 किमी अंतरावर हे बेट आहे. न्यूझीलंडसंदर्भातील भौगोलिक धारणा आता बदलण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडसहित जगाच्या भूगोलाची पुनर्रचना करणारे अमेरिकेतील `जिओलॉजिकल सोसायटी`च्या अभ्यास नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
वेलिंग्टन : न्यूझीलंड हा देश एक मोठं क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागरातील एक बेट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस 1500 किमी अंतरावर हे बेट आहे. न्यूझीलंडसंदर्भातील भौगोलिक धारणा आता बदलण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडसहित जगाच्या भूगोलाची पुनर्रचना करणारे अमेरिकेतील "जिओलॉजिकल सोसायटी'च्या अभ्यास नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
न्यूझीलंड, न्यू कॅलेडोनिया आणि या भागामधील इतर बेटे ही एका स्वतंत्र खंडाचा भाग असून या "नव्या खंडा'चे क्षेत्रफळ सुमारे 20 लाख चौरस मैल इतके आहे. या खंडाचा 94% भाग पाण्याखाली आहे. मात्र या खंडाचा भाग हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीपासून भौगोलिकदृष्टया वेगळा असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनिया ही बेटे ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग असल्याचेच मानले जात होते. यामुळे या भागाला ऑस्ट्रेलेशिया असे भौगोलिक नाव देण्यात आले होते. कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भूगर्भशास्त्रज्ञ सांता बार्बरा यांनी 1995 मध्ये न्यूझीलंडचे स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व दर्शविण्यासाठी या भागाचे नामकरण "झिलांडिया' असे केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या या संशोधनाने या विचारप्रवाहास अधिक पुष्टी मिळाली आहे.
झिलांडिया खंड हा मूळ गोंडवाना या "सुपरकॉंटिनंट'चा भाग असल्याचे मॉर्टिमर यांनी म्हटले आहे. झिलांडिया खंडाचे क्षेत्रफळ हे ऑस्ट्रेलिया खंडाच्या दोन तृतीयांश इतके आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी गोंडवानामधून फुटून तयार झालेल्या आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडाप्रमाणेच झिलांडियाचीही निर्मिती झाली असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
खंड म्हणून मान्यता देण्यासाठी सर्व मापदंडांची पूर्णता झिलांडियाकडून होत असल्याचेही या संशोधनामधून स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या संशोधनामुळे अनेक युरोपिअन, आशियाई, आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशी भावना मॉर्टिमर यांनी व्यक्त केली आहे.