नवी दिल्ली :  पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये हरीपूरजवळ पीर थान माउंटेन खाली एक गुप्त अण्विक शस्त्रास्त्र भंडार तयार करण्यात आले आहे. सैन्यातील गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या शस्त्रास्त्र भंडाराबाबत माहिती मिळाली आहे. 


शाहिन-३ बॅलेस्टिक मिसाईल तैनात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सैन्यातील गुप्तचरांनी गोळा केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने शाहिन३ ही बॅलेस्टिक मिसाइल गुप्तपणे तैनात केली आहे. अशा प्रकारे गुप्तपणे तैनात करून भारतासाठी धोका निर्माण करण्यात आला आहे.  ज्या ठिकाणी पाकिस्तानने तैनात करण्यात आले तेथून अमृतसर ३२० किमी, चंडीगड ५२० किमी आणि दिल्ली ७२० किमी आहे. 


गेल्या वर्षी करण्यात आले शाहिन३ चे परिक्षण


 
पाकिस्तानने शाहिन-३ चे पहिले परिक्षण ९ मार्च २०१५ ला करण्यात आले होते. शाहिन ३ २७५० किलोमीटर दूर अंतरावर जमीनीवरून जमीनवर हल्ला करू शकते.