19 वर्षांच्या संसारानंतर कळलं बायको पुरुष आहे
19 वर्ष संसार केल्यावर बायको महिला नसून पुरुष असल्याचं बेल्जियममधल्या एका व्यक्तीला कळलं.
बेल्जियम : 19 वर्ष संसार केल्यावर बायको महिला नसून पुरुष असल्याचं बेल्जियममधल्या एका व्यक्तीला कळलं. खुद्द बायकोनंच तिच्या नवऱ्याला ही कबुली दिली. बेल्जियममध्ये राहणाऱ्या जेन यांचं लग्न 19 वर्ष पहिले इंडोनेशियाच्या मोनिका नावाच्या महिलेबरोबर झालं. यानंतर जेन मोनिकाला घेऊन बेल्जियमला घेऊन गेले.
सेक्स करताना मोनिका सॅनिटरी टॉवेल वापरायची आणि मासिक पाळी असल्याचं कारण द्यायची अशी प्रतिक्रिया जेननं दिली आहे. मोनिकाला नोकरी लागल्यानंतर आमच्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागली. माझ्या मित्रांनी मला मोनिकानं लिंग बदलाचं ऑपरेशन करून ती महिला झाल्याचं सांगतिलं, याबाबत मी तिला विचारल्यावर तिनं हे कबूल केलं, असं जेन म्हणाला आहे.
माझा जन्म पुरुष म्हणून झाला होता, पण ऑपरेशन करून मी महिला झाले. माझ्या भुतकाळाविषयी सांगण्याची गरज मला वाटली नाही, अशी प्रतिक्रिया मोनिकानं दिली आहे. ही गोष्ट कळल्यावर जेनला मात्र मोठा धक्का बसला आहे. माझं आयुष्य बरबाद झाल्याचं वक्तव्य जेननं केलं आहे. हे प्रकरण आता कोर्टामध्ये असून धक्का बसल्यानं आता जेनवर उपचार सुरु आहेत.