नवी दिल्ली :  जनावरांमध्ये नेहमी स्वतःला ताकदवान दाखविण्याची लढाई सुरू असते. कारण जो कमजोर पडला तो दुसऱ्याचे भोजन बनतो. पण मुकाबला बरोबरीचा असेल तर अशात निकाल लागणे कठीण असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात जराशी पण चूक बाजी पलटवू शकते.  प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण ऑस्ट्रेलियातील हा व्हिडिओ खूपच थरारक आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विंसलँडमध्ये एक अजगर आणि मगरीमध्ये जबरदस्त लढाई झाली. ती सुमारे पाच तास चालली. पण अखेर अजगराचा विजय झाला. अजगराने ही लढाई केवळ जिंकली नाही तर त्याने मगरीला गिळून टाकले. 


 



सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँडमध्ये मुंदरा तलावाच्या जवळची हि विचित्र घटना स्थानिक लोकांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. ४ मार्चला यूट्यूबवर टाकल्यावर आतापर्यंत त्याला ५ कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.