भारतीय कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पाकिस्तानची लफवाछपवी
भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आता लफवाछपवी दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी ही लफवाछपवी दिसत आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आता लफवाछपवी दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी ही लफवाछपवी दिसत आहे.
पाकिस्तानने पुरावे नष्ट करण्यासाठीप्रयत्न सुरु केले आहेत. सर्जिकल स्ट्राईकमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांचा दफनविधी सुरु केला आहे, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. दरम्यान, दहशतवादी मसूद अझर याला कोणतेही भाष्य करु नये, अशी पाकिस्तानने तंबी दिल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे भारताने उरी हल्ल्याचा बदला घेतल्याने पाकिस्तानाच्या गोटात दाणादाण उडाली आहे. आमवस्येच्या आदल्या रात्री मिट्ट काळोखात भारतीय लष्कराच्या दीडशे जवानांनी केलेल्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तानला काही कळण्याच्या आतच खेळ खल्लास झाला. भारतला उत्तर दिलं तरी पेच आणि नाही दिलं तरी पेच. भारतानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची दाणादाण उडली आहे.