नियामे : बऱ्याच शतकापासून पुरुष प्रधान संस्कृती चालत येत आहे. सर्व गोष्टी या पुरूषांच्या म्हणण्याप्रमाणेच सुरु आहेत तसं नाही झालं तर महिला या आज ही पुरुषांच्या अत्याचार आणि पुरूषीपणाचे बळी ठरत आहे. पण पश्चिम आफ्रिकेतील नायजर दा देश याला अपवाद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम आफ्रिकेतील या देशात महिला आपल्या इच्छेप्रमाणे जगतात. येथे महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. पण येथे मुलांना पडद्यात राहायला लागतं. येथे महिला लग्नाआधी किंवा लग्नानंतरही कितीही तरुणांशी संबध ठेऊ शकतात आणि आपल्या इच्छेनुसार कोणत्याही पुरुषासोबत लग्न करु शकतात.


मुलांना मात्र येथे आपला चेहरा समाजापासून लपवून ठेवावा लागतो. तुआगो जमातीत महिला कधीही आपल्या नवऱ्याला सोडून देऊ शकतात. येथे लग्न होणे आणि लगेचच घटस्फोट ही साधारण गोष्ट झाली आहे.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटस्फोट झाल्यानंतर महिला आपल्या नवऱ्याकडून काहीही मागू शकते आणि कोणतीही अपेक्षा ठेऊ शकते. तसेच पुरुषांना येथे कोणते मोठे निर्णय घ्यायचे असतील तर ते महिलांच्या परवानगीनेच घ्यावे लागतात. जगाच्या पाठीवर असा देश आणि रितीरिवाज पाहून तुमच्या ही भूवया उंचावल्या असतील.