अबुजा : नायजेरियाचे मौलवी मोहम्मद बेल्लो अबुबकर यांचं निधन झालंय. 130 महिलांचा पती आणि 203 मुलांचा पिता असलेल्या अबुबकर यांचा वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबुबकर यांना 'बाबा' म्हणूनही ओळखलं जात होतं. 'आपली वेळ पूर्ण झालीय... आणि आपलं दैवी कार्य संपुष्टात आलंय... खुदाला भेटण्याची वेळ झालीय, असं बाबांनी मला सांगितलं होतं' असं म्हणत अबुबकर यांचा सहाय्यकानं या बातमीला दुजोरा दिलाय. 


इस्लामिक मौलवी असलेले अबुबकर आपल्या विवाहांमुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होते. एका 'पाक' उद्देशानं आपण इतके विवाह करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. अल्लाहनंच आपल्याला असं करण्यास सांगितलंय आणि ते आपण शेवटपर्यंत करत राहणार असंही त्यांनी म्हटलं होतं. 


2008 साली अबुबकर यांना 86 पत्नींपैकी 82 पत्नींना 'तलाक' देण्याची इतर मुस्लीम मौलवींनी मागणी केली होती. परंतु, याला अबुबकर यांनी नकार दिला होता. 


अबुबकर यांच्या काही पत्नी गर्भवती असल्याचं म्हटलं जातंय... त्यांना सध्या 203 मुलंही आहेत.