नवी दिल्ली : फ्रान्समध्ये एक असा अनोखा रस्ता आहे जो २ दिवसातून केवळ दोन तासांसाठी खुला होता. इतर वेळी या रस्त्यावर भरतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी असते. चारही बाजूला पाणीच पाणी असते. हा रस्ता मेनलँडला नॉईरमोटियरला जोडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रस्त्याची लांबी ४.५ किमी इतकी आहे. पॅसेज डू गोईस या नावाने हा रस्ता ओळखला जातो. १७०१मध्ये पहिल्यांदा या रस्त्याला नकाशात स्थान देण्यात आले होते. 


या रस्त्याला पार करणे फारच धोकादायक मानले जाते. केवळ दोन तास हा रस्ता जाण्या-येण्यासाठी खुला होतो. इतर वेळेस या रस्त्यावर समुद्राचे पाणी भरलेले असल्याने रस्ता दिसतच नाही.