मुंबई : शौचालय ही मनुष्याची निर्मिती आहे असं आपल्याला साधारणपणे वाटतं. पण, जर्मनीतील एका विद्यापीठीच्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात मुंग्या त्यांच्या वारुळांत ठरावीक ठिकाणी शौचालयं तयार करतात असं निष्पन्न झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणसाप्रमाणेच मुंग्यांनाही स्वच्छता आवडते आणि त्याबाबतीत मुंग्या गंभीर असतात. या संशोधकांनी मुंग्यांच्या एकेका गटाला विविध रंगाचं खाणं दिलं. त्यानंतर त्यांच्या सवयींचा अभ्यास केला. त्यांना आढळलेल्या माहितीनुसार मुंग्यांच्या प्रत्येक वारुळात एक विशिष्ट जागा ही मलविसर्जनासाठी तयार केलेली असते. तिथेच जमा होऊन या मुंग्या आपले नैसर्गिक विधी पार पाडतात. 


नॅशनल जिओग्राफिकमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यात म्हटले आहे की इतर कीटक मलविसर्जनासाठी आपल्या घरट्यापासून दूर जातात आणि शरीराची स्वच्छता करतात. पण, मुंग्या मात्र त्यांच्या वारुळातच का शौचालयाची निर्मिती करतात, हे समजू शकलेलं नाही. या मलविसर्जनाचा त्यांना काहीतरी उपयोग होत असेल, असा संशोधकांना संशय आहे.