टोकियो : जपानची राजधानी टोकियापासून अगदी जवळचं असणाऱ्या एका अंपगांच्या आश्रमात एका माथेफिरून 19 जणांची भोसकून हत्या केली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास टोकियो जवळच्या सागमिहारा शहरात ही घटना घडली.


पोलिसांनी 26 वर्षाच्या सतोषी उमस्तू या तरुणाला अटक केली आहे. हे निर्घृण त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हल्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.