काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण अतिरेकी हल्ला झालाय. मध्य काबुलच्या अत्यंत गजबजलेल्या पुली मोहम्मद खान या भागात एका कारमध्ये स्फोट झालाय. यात आतापर्यंत २४ जण ठार झाल्याची माहिती मिळालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणी गुप्तचर संस्था, नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटीच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झालाय. तालिबानचा प्रवक्ता हबिझुल्ला मुजाहिद यानं केलेल्या दाव्यानुसार अतिरेक्यांनी या कार्यालयात प्रवेश मिळवलाय. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नसला तरी NDSच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गोळीबाराचे आवाज येतायत. 


गेल्याच आठवड्यात बंडखोर तालिबानी अतिरेक्यांनी हल्ले सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर झालेला आजचा पहिलाच मोठा हल्ला आहे. यामध्ये कोणी दगावल्याचं अद्याप वृत्त नाही. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी स्फोट घडल्यानंतर पोलिसांनी परिसर तातडीनं रिकामा केलाय.