माली : सरकारसाठी लढणाऱ्या संघटनेच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मालीमध्ये असलेल्या कॅम्पवर हा आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला.


अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. इस्लामिक संघटना आणि सरकारच्या बाजूने लढणाऱ्या या संघटनांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.