बुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
बुलडाण्याचे भूमीपुत्र लोणारच्या पांगरा डोळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शास्रज्ञ आंतराष्ट्रीय संबधांचे अभ्यासक बाळासाहेब दराडे हे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला विषेश निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत.
वॉशिंग्टन : बुलडाण्याचे भूमीपुत्र लोणारच्या पांगरा डोळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शास्रज्ञ आंतराष्ट्रीय संबधांचे अभ्यासक बाळासाहेब दराडे हे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला विषेश निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत.
प्रलंबित आर्थिक, कायदेशीर बाबी, संरक्षण, आय टी, ऊर्जा, औषध निर्माण या क्षेत्रात दोन्ही देशांच्या हिताचे निर्णय घेवून भारत आणि अमेरिकेच संबध अधिक सदृढ करण्याकरता प्रयत्न करू, अशी ग्वाही शपथविधीपूर्वी केलेल्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याचं बाळासाहेब दराडे यांनी म्हटलंय.
नासातला शास्त्रज्ञ ते गावच्या ओढीनं ग्रामीण भाग बदलायला आलेला तरूण जिल्हा परिषद सदस्य अशी ओळख असेलेले दराडे सध्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या समित्यावंर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्य असेलेल्या संशोधक दराडे यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आग्रहानं राजकारणात प्रवेश केला मात्र कुठल्याही पक्षात न जाता आजवर अपक्ष म्हणून त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीच्या निमित्तानं जगभरातील मान्यवरांच्या भेटीत महाराष्ट्रात गुंतवणूकीबद्द्ल उत्सुकता दिसून आल्याचही दराडे म्हणाले.
मिकाचा खास परफॉर्मन्स...
दरम्यान, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी काही खास भारतीयांना निमंत्रित करण्यात आलंय. गायक मिका सिंग या सोहळ्यात आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे. शपथविधीच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक उद्योजक, सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. मिकासोबतच बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया मनस्वीही या शपथविधी समारंभात खास परफॉर्मन्स सादर करणार आहे.