नवी दिल्ली : बलूच नेता ब्रह्मदाग बुगातीने भारतात येण्यासाठी शरण पत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलूच रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख बुगाती यांनी म्हटलं की, ते भारत, अफगानिस्तान आणि बांग्लादेशला आंतरराष्ट्रीय कोर्टात चीनविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगणार आहे. बलूतमधील लोकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


भारत सरकारकडून पासपोर्टसह इतर कागदपत्रांसाठी कोणतंही लिखीत अर्ज नाही केला आहे. जेव्हा त्यांना सरकारकडून काही संकेत मिळतील तेव्हाच ते यावर पाऊल उचलतील. त्यांनी म्हटलं की, ते सध्या खूप त्रास सहन करत आहेत. त्यामुळे जर भारतात जाण्याची संधी मिळणार असेल तर ते नक्की भारतात येतील.


जेव्हा बुगतीला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला भारतातच का विलीन व्हायचंय ? तेव्हा त्यांनी म्हटलं की, युरोप आणि तेथील लोकांना आमच्या समस्यांबाबत काहीच माहित नाही आणि ते माहितीही करु घेऊ इच्छित नाही. पण भारताला याबाबत माहिती आहे. भारत आमचं समर्थन देखील करतो. भारतातील लोकं आमच्या जवळ आहेत. त्यामुळे तेथील लोकं आम्हाला शरण देऊ शकतात. भारतात परिवारासह जाणं जगात इतर कोणत्याही देशात जाण्यापेक्षा चांगलं आहे.