वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल बौद्ध धर्माचे गुरु  दलाई लामा यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. ओबामा आणि दलाई लामा यांच्या भेटीवर चीनने आक्षेप घेतला होता. यामुळे चीन-अमेरिकेचे संबंध बिघडतील, असा इशारा चीनने दिला होता. ओबामांनी याकडे दुर्लक्ष करत दलाई लामांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबामा हे नेहमी जागतिक नेत्यांना ओवल ऑफिसात भेटतात. मात्र काल लामांची त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली. ही भेट व्यक्तिगत आणि नैसर्गिक असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले आहे. रविवारी झालेल्या गे नाईट क्लबवरील हल्ल्याचा दलाई लामा यांनी निषेध केला.