ओरलँडो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या यशाचं श्रेय डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिलरी यांनी आपल्याला उत्तम राष्ट्रपती बनवलं आणि याबद्दल कोणतंही श्रेय घेतलं नाही, असं बराक ओबामा यांनी म्हटलंय. माजी परदेश मंत्री म्हणून त्यांनी अनेक कठिण निर्णय घेतले... उत्तम काम केलं तेही न थकता, असंही त्यांनी म्हटलंय. 


यावेळी, ओबामांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून हिलरींची बाजू उचलून धरली. हिलरी अशा कमांडर इन चीफ असतील ज्या आयएसआयएसला पाणी पाजू शकतील. त्या अमेरिकेच्या हुशार आणि दृढ राष्ट्रपती बनतील. 


हिलरी यांनी वास्तविकतेत जग समजतं... त्यांना आव्हानं समजतात... त्यांचा सामनाही त्या नेटाने करतात... आणि जेव्हा काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा त्या केवळ तक्रारी करत बसत नाहीत किंवा त्याचा दोष इतरांना देत नाहीत, असं म्हणत हिलरींवर कौतुकाची फुलंच ओबामांनी उधळलीत.