न्यूयॉर्क : इसिस या दहशतवादी संघटनेचे संस्थापक अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे  आहेत, अशी  टीका अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिस्पर्धी हिलरी क्‍लिंटन यांच्यावर  यापूर्वी ट्रम्प यांनी 'इसिस'चा संस्थापक असल्याचा आरोप केला होता. 


बुधवारी रात्री फ्लोरिडा येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला आहे.  


ओबामा यांचे 'बराक हुसेन ओबामा' असे संपूर्ण नाव घेतले. संपूर्ण भाषणादरम्यान ट्रम्प यांनी 'ते इसिसचे संस्थापक आहेत' असा उल्लेख तीन वेळा केला. 


जर ट्रम्प हे अध्यक्षपदी निनवडून आले तर ते सर्वांत बेपर्वा अध्यक्ष असतील, अशी टीका तज्ज्ञांनी केली आहे. कारण प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रम्प वारंवार चर्चेत येत आहेत. या आधी 'क्‍लिंटन यांना अध्यक्षपदापासून बंदुकधारीच दूर ठेवू शकता' असे वक्तव्य केले आहे.