नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानवर नाव न घेता हल्लाबोल केला आबहे. ओबामांनी म्हटलं की, पाठीत वार करण्यापासून पाकिस्तानने वाचावं. नाहीतर दहशतवाद तुम्हाला नष्ट करुन टाकेल. दहशतवादामुळे पश्चिम आशिया प्रभावित होत आहे. ओबामाने भारत आणि चीनचं कौतूक केलं. म्हटलं की, अंतरराष्ट्रीय व्यवस्थेमुळे चीन आणि भारत शानदार विकास करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरीने यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना म्हटलं की, इस्लामाबादने दहशदवाद्यांना थारा देणं बंद करावं. भारताच्या लष्कर छावणीवर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली. तर परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी देखील पाकिस्तानला खडसावलं होतं.


अमेरिकेच्या संसदेत देखील पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषिक करावं म्हणून बिल आणलं गेल्याची एका वेबसाईटने माहिती दिली आहे. नवाज शरीफ मात्र महासभेत काश्मिरच्या मुद्दयावरच बोलतांना दिसत आहे.