मिंस्क : नेत्यांना आंधळेपणाने फॉलो करणं कसं हास्यास्पद ठरू शकतं, याचं उत्कृष्ट सध्या युरोपच्या मिंस्कमध्ये पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपचं एक महत्त्वाचं शहर असलेल्या बेलारुमध्ये अनेक महिला आणि पुरुष कपड्यांशिवाय ऑफिसमध्ये दाखल झाले... आणि त्याच अवस्थेत त्यांनी कामही केलं.


इतकंच नाही तर आपले सेल्फी आणि फोटोही त्यांनी #getnakedandwork या हॅशटॅगनं शेअर केलं. 


का केलं त्यांनी असं... 


इथले राष्ट्रपती अलेक्झडर लुकशेंको यांनी आपल्या नागरिकांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी 'लोकांनी कपडे उतरवून तेव्हापर्यंत काम करा जेव्हापर्यंत तुम्हाला घाम येणार नाही' असं आवाहन केलं होतं. 


बेलारुसमध्ये सध्या आर्थिक मंदी सुरू आहे... आणि यामधून बाहेर पडण्यासाठी जीव ओतून काम करा, असं राष्ट्राध्यक्षांना म्हणायचं असावं... त्यामुळे त्यांनी 'कपडे सोडा आणि काम करा' असा संदेश दिला... आणि त्यांच्या फॉलोअर्सनं तो जसाच्या तसा अंमलातदेखील आणला.


त्यांच्या या आवाहनाचा लोकांनी शब्दश: अर्थ घेतला आणि कपडे न परिधान करत ते ऑफिसमध्ये दाखल झाले. यामुळे राष्ट्रपती आणि त्यांचं आवाहन दोन्हीही हास्याचा विषय ठरेल.