सट्टेबाजांची पसंत हिलरींना, भारतात 600 कोटींचा सट्टा
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टाबाजारही गरम झाला आहे.
मुंबई : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टाबाजारही गरम झाला आहे. भारतातल्या तसंच जगभरातल्या सट्टाबाजारात हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या अध्यक्ष होतील असं भाकित वर्तवलं जातं आहे.
भारतात हिलरींवर 45 पैसे तर ट्रम्प यांच्यावर 1 रुपया 40 पैशांचा भाव आहे. अमेरिकेमध्ये हिलरींसाठी 0 पूर्णांक 40 डॉलर्स तर ट्रम्प यांच्यावर 1 पूर्णांक 44 डॉलर्सचा भाव सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये फार कमी फरक होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात सुमारे 600 कोटींचा तर जगभरात 2 हजार कोटींचा सट्टा अमेरिकेच्या निवडणुकीवर लागला आहे.