नवी दिल्ली : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू कश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानकडून गोळाबार करण्यात आला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सोमवारी देखील चार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्त्यूतर दिलं. यामध्ये ५ नागरीक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून कुरापती या सुरुच आहेत. यामध्ये पाकिस्तानमधील काही मंडळी देखील मागे नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियांदादने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. मियांदाद यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवर बोलत असतांना मोदींबद्दल अपशब्द वापरले आहेत.


मियांदाद यांनी भारताला कमकुमत म्हणत युद्धाचं आव्हान दिलं आहे. यूट्यूबवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मियांदाद भारतातील नागरिकांचं तर कौतूक करतायंत पण पंतप्रधान मोदी आणि लष्करावर टीका करत आहेत.