नवी दिल्ली : इंडोनेशियामध्ये यापुढे अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना कडक शिक्षा फर्मावली जाणार आहे. या प्रकरणांतील आरोपींना देहदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते, किंवा त्यांना रासायनिक पद्धतीनं नपुंसक बनवण्याची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. 


न्यायाधीशांना परवानगी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सिडनी मॉर्निंग हेरल्ड'नं दिलेल्या बातमीनुसार, इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या आठवड्यात एका नियमाची घोषणा केली. या नियमानुसार न्यायाधीशांना अल्पवयीनांच्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा सुनावण्याची परवानगी दिली गेलीय. 


ओळख होणार सार्वजनिक 


यासोबतच अतिरिक्त शिक्षा म्हणून अपराध्यांची ओळख सार्वजनिक केली जाऊ शकते. तसंच एखादा आरोपी पॅरोल मिळवून तुरुंगाच्या बाहेर पडला असेल तर त्याला 'इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग डिव्हाईस' आपल्यासोबत ठेवणं बंदनकारक असेल.