बोअरवेलमधून ३ वर्षाच्या मुलाला अलगद बाहेर काढलं
बोअर वेलमधून तीन वर्षाच्या मुलाला कोणतंही खोदकाम न करता बाहेर काढण्यात आलं आहे.
बीजिंग : बोअर वेलमधून तीन वर्षाच्या मुलाला कोणतंही खोदकाम न करता बाहेर काढण्यात आलं आहे, बोअर वेलची खोली ही ९० मीटर असतानाही प्रयत्नाची पराकाष्ठा करत फायर ब्रिगेडने या मुलाला जिवंत बाहेर काढलं. तो खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला आणि ११.८ मीटर खोलीवर जाऊन अडकला.
फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झालं आणि कॅमेरा तसेच आधुनिक वायर्सवापरून या मुलाच्या उजव्या हाताला आणि मनगटाला बांधले, या नंतर त्याला वर खेचण्यात आले. हा मुलगा बोअरवेलमध्ये २ तास होता, त्याची प्रकृती आता ठणठणीत आहे. चीनच्या शानडोंग परिसरातील ही घटना आहे.