नवी दिल्ली : नेहमी दुसऱ्यांच्याच आधारावर जगणाऱ्या पाकिस्तानला आता आणखी एक झटका लागला आहे. पाकिस्तानने युएनमध्ये काश्मीरचा मुद्दा लावून धरला पण उरी हल्ल्यावर एक शब्द ही काढला नाही. आधी अमेरिका आणि नंतर चीनच्या आधारामुळे पाकिस्तान हा मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. पंतप्रधान मोदी यांचे बराक ओबामा, गणी आणि इतर बलाढ्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चांगल्या संबंधामुळे आज अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, फ्रान्स या सारखे देश भारताच्या बाजुने उभे राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन हा एकटाच देश पाकिस्तानच्या बाजुने उभा होता पण आता चीनने देखील पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. चीनने म्हटलं की ते कश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानसोबत नाहीत. पाकिस्तानच्या मीडियामध्ये अशा बातम्या सुरु होत्या की चीनहा काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान सोबत उभा राहणार आहे पण चीनने या गोष्टीचं खंडन करत याला साफ नकार दिला आहे.


चीनीचे परराष्ट्र मंत्री लू केंग यांनी म्हटलं की, 'आम्ही आशा करतो की दोन्ही देश यावर शांतीपूर्वक चर्चा करतील. आम्ही काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला कोणतंही समर्थन नाही देणार आहोत. चुकीच्या बातम्या या पाकिस्तानच्या मीडियामध्ये दाखवल्या जात आहेत.'


चीन हा एकमेव देश सध्या पाकिस्तानच्या बाजुने उभा होता. पण आता चीनने देखील पाकिस्तानची साथ सोडल्याने पाकिस्तान संकटात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं खच्चीकरण करण्य़ाची योजना यशस्वी होतांना दिसत आहे.