नवी दिल्ली :  भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन म्हटला की चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. दोन्ही देशांनी या परिस्थितीत तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 


चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी मीडियाला सांगितले की, चीनने दोन्ही देशातील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.


उरी हल्ल्यानंतर आठवड्यातच सुरू झालेल्या भारत आणि चीन दहशतवाद विरोधी चर्चेनंतर सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला का. यावर उत्तर देताना चीनने विषय बदलून सांगितले की, भारत आणि पाक यांनी चर्चेतून प्रश्न सोडवावे. तसेच शांतीसाठी आणि प्रदेशातील सुरक्षित वातावरण कायम राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 


चीनने विविध स्तरावर दोन्ही देशांशी संपर्क केला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही चीनचे मित्र देश आहेत. 


दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर चीन पाकिस्तानच्या बाजूने आहे, या पाकच्या वक्तव्याचा चीनने इन्कार केला.